निपाणी (वार्ता) : खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची रविवारी एकसष्टी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील महादेव मंदिरात श्री गणेश मंडळ व हेल्थ क्लब यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून १०१ जणांनी रक्तदान केले.
याशिवाय प्रभाग क्रमांक ६, ७, ८ आणि १४ मध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली.
हॅलो सिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, नगरसेविका गीता पाटील, संचालक महालिंग कोठीवाले व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील प्रास्ताविकात महादेव मंदिर, गणेश हेल्थ क्लबतर्फे राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यांनी केले. हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील यांनी, महादेव मंदिर कमिटी व श्री गणेश मंडळाने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
त्यानंतर डास प्रतिबंधक औषध फवारणीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमास रवींद्र शेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, शहर भाजपा अध्यक्ष प्रणव मानवी, रवींद्र कोठीवाले, सदानंद चंद्रकुडे, नगरसेवक दत्तात्रय जोत्रे, दीपक माने, सुनील पाटील-आडीकर
मल्लिकार्जुन गडकरी, दयानंद कोठीवाले, राजशेखर कोठीवाले, बाळासो जाधव, विजय चंद्रकुडे, शेखर चंदुरे, संयुक्ता साजन्नावर, बाबासाहेब चंद्रकुडे, नगरसेविका सोनाली उपाध्ये, निर्मला चंद्रकुडे प्रा. विभावरी खांडके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बाबासाहेब साजन्नावर यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र चंद्रकुडे यांनी आभार मानले.