
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्या भिषेक सोहळा वर्ष व विश्व हिंदू परिषदेची षष्ठीपुर्ती वर्षानिमित्त बजरंग दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासना रूढ भव्य मिरवणूक बुधवारी (ता.११) दुपारी ४ वाजता बस स्थानकाजवळील मानवी गॅरेज येथून शिव पूजन करून निघणार आहे. त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे चौकात त्याची सांगता होणार आहे.
येथील बस स्थानक सर्कल धर्मवीर संभाजीराजे चौक, साखरवाडी, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी मालुसरे चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, जोशी गल्ली, बेळगाव नका, जुना मोटर स्टॅन्ड, मार्गे पुन्हा नरवीर तानाजी मालुसरे चौक चौकात मिरवणूक येणार आहे. या ठिकाणी सभा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या रथयात्रेमध्ये शहर आणि परिसरातील शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन
बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अजित पारळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta