
आठ जण जखमी
निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात बुधवारी (ता.१८) सकाळी पाच वाहनांचा विचीत्र अपघात झाला. त्यामध्ये एक जण ठार झाला असून झाला ८ जण जखमी आहेत. ज्ञानेश्वर सिद्राम गोवेकर (वय ३३ रा. कणबर्गी, बेळगाव) बेळगाव असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेश लक्ष्मण खणगावकर (रा. बेळगाव), रेवन्ना बाबुराव देसाई (वय २७), सचिन मच्छिंद्र लोहार (वय ३६ दोघेही रा. विटा, जि. सांगली), मोईन खान (वय २०) आणि रूमन (वय २३ दोघेही रा. बंगळूर), स्नेहा अनंत कुलकर्णी (वय ५५), नंदिता अनंत कुलकर्णी (वय ६५ दोघीही रा. टिळकवाडी बेळगाव) अशी जखमींची नावे आहेत. वरील सर्व जखमीवर येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याबाबत निपाणी शहर पोलीस शहर घटनास्थळी भेट देऊन या अपघातांची चौकशी सुरू केली आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बेळगावकडून नारळ पोती भरून ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने तवंदी घाटामध्ये पुढे जाणाऱ्या पाच वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये तीन ट्रक, मोटार, आणि बोलोरो या पाचही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. बेळगावकडून हमीदवाडा येथे दूध आणण्यासाठी बोलेरो घेऊन ज्ञानेश्वर गोवेकर गोवेकर जात होते. मागून येणाऱ्या ट्रकची जोराची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर इतर वाहनातील चालक व नागरिक जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे तवंदी घाटातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी करण्याचे काम सुरू आहे. नेमका वळणावरच अपघात झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी जखमींना येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. यानंतर टप्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनाची संख्या मोठी होती. गर्दीतून रुग्णवाहिका पुढे सोडताना कसरत करावी लागली. मंडल पोलीस निरीक्षक निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका उमादेवी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta