वाहनांची तपासणी : चारचाकी वाहनांवर नजर
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांच्या वतीने दिवसभर बंदोबस्त ठेवला होता.
1 नोव्हेंबर कर्नाटक राज्याचा राज्योत्सव असला तरी मराठी भाषिक लोक काळा दिन म्हणून साजरा करतात. लगतच असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावला जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाच्या वतीने त्यांना कर्नाटक कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करूनच त्यांना कर्नाटक प्रवेश दिला जात आहे. सकाळी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यानंतर दिवसभर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
चिकोडी डीवायएसपी जी बी गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक बी एस तळवार, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह अन्य पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
1 डीवायएसपी, 1 मंडल पोलीस निरीक्षक, 3 उपनिरीक्षक, 8 एएसआय, 80 पोलिस तैनात करण्यात आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta