उपाध्यक्षपदी निरंजन पाटील यांची निवड
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या ममदापूर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन कावडकर यांची तर उपाध्यक्षपदी निरंजन पाटील-सरकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रारंभी विजय हातगिणे यांनी स्वागत करून गेल्या ८ वर्षांपासून ममदापूर शाखा यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. शाखेकडे ४.८७ कोटी ठेवी, ३.४३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्था मुख्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, ग्राहक, ठेवीदारांना सेवा पुरवित असल्याचे सांगितले.
निवडीनंतर गजानन कावडकर, निरंजन पाटील व मावळते अध्यक्ष रमेश शेट्टी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी मुख्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, सदानंद धनगर, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, दिनेश पाटील, सीईओ शशीकांतआण्णावर, अनिकेत कुलकर्णी, उत्तम पाटील, रावसाहेब गोरवाडे, संजय स्वामी, किरण चव्हाण, नेताजी हरेल, सचिन गोरवाडे, महालिंग गावडे, राजगोंडा पाटील, चनगोंडा पाटील, पद्माकर पाटील, किशोर नलवडे, वैभव खोत, सुखदेव साळुंखे यांच्यासह संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta