लक्ष्मणराव चिंगळे; शेफर्डस इंडिया इंटरनॅशनल संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड
निपाणी (वार्ता) : नवी दिल्ली येथील शेपर्ड्स इंडिया इंटरनॅशनल या संस्थेच्या राष्ट्रीय सचिवपदी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व कर्नाटक धनगर समाजाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी ही निवड जाहीर केली. त्यानंतर येथील विश्राम धामात आयोजित बैठकीत शेफर्ड राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
चिंगळे म्हणाले, या निवडीमुळे शेफर्ड संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत व देशाबाहेर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी राज्य धनगर समाजाच्या अध्यक्षपदी काम केले आहे. या कमिटीमध्ये ५१ जणांची कार्यकारणी आहे. सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय कार्यकारिणीवर आपली निवड झाली आहे. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेच्या विविध प्रकारच्या धनगर जाती व प्रजातीच्या मेंढपाळ बांधवांना शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायिक, सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.
चिंगळे यांच्या निवडी प्रसंगी शेपर्ड्स् इंडिया इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष एच. एम. रेवण्णा, माजी विधानपरिषद सदस्य विवेक पाटील, डॉ. राजेंद्र सन्नक्की, मद्याप्पा तोळीन्नावर, बसवराज बसलीगुंडी, विनायक बनहट्टी, एस. एस. नसलापूरे यांच्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या धनगर समाजाच्या प्रमुखांची उपस्थिती होती. लक्ष्मण चिंगळे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.