Thursday , March 5 2026
Breaking News

बोरगाव नवनिर्वाचित नगरसेवकांचा नगरपंचायत कार्यालयात प्रवेश

Spread the love

उत्तम पाटील यांची उपस्थिती : शहराच्या विकासासाठी कार्य करणार

निपाणी (वार्ता) : नुकत्याच पार पडलेल्या बोरगाव नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विजयी नगर विकास पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शुभमुहूर्तावर नगरपंचायत कार्यालयात प्रथमताच प्रवेश करण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून सर्व नगरसेवकांचा प्रवेश प्रित्यार्थ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थित प्रवेश झालेल्या सर्व नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात प्रतिमेचे दर्शन घेऊनकलश पूजन केले. महिलांनी पूजाअर्चा करून नगरपंचायत कार्यालयात प्रवेश केला. जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र राहून येणार्‍या काळात शहरातील उर्वरित सर्वच कामे पूर्णत्वाला नेऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अभय मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, तुळशीदास वसवडे, दिगंबर कांबळे, पिंटू कांबळे, शोभा हवले, सुवर्णा सोबाणे, भारती वसवाडे, वर्षा मनोगुत्ते, जावेद मकानदार, रोहित माने-पाटील, संगीता शिंगे, अश्विनी पवार, गिरिजा वठारे, रुकसाना अफराज यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *