Saturday , July 27 2024
Breaking News

अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रेला निर्बंध; धार्मिक कार्यक्रमांना अनुमती

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंमणगी श्री मल्लिकार्जुन यात्रा शासनाच्या मार्गसूचीनुसार धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सभेला हुक्केरी तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार यांनी मार्गदर्शन केले.
कर्नाटकात ओमीक्रॉनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने यात्रोत्सवाला परवानगी देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यात्रा परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यास अनुमती दिली जात आहे. सभेत यात्रा कमिटी आणि पुरोहितांनी मांडलेल्या विषयांवर जिल्हाधिकारीच निर्णय घेतील. आपण यात्रा कमिटीने मांडलेले विचार जिल्हाधिकारींपर्यंत निश्चितच पोचविणार आहोत. यात्रा कमिटीने गेल्या दोन-तीन वर्षांत यात्रा रहित करण्यात आल्यामुळे देवस्थानची आर्थिकस्थिती नाजूक झाल्याचे म्हटले आहे. पुरोहित आर्चक यात्रा रहित केल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. या गोष्टींची जाणीव आपण जिल्हाधिकारी यांना करुन देणार आहोत. यावेळी यात्रोत्सवावर अनेक लोकांची रोजी रोटी चालते. यात्रा रहित केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे तहसीलदार साहेबांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. सभेला अंमणगी श्री मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एल. व्ही. पाटील, बाळप्पा मंजरगी, सुरेश हुण्चाळी, कलगौडा नागौडा, प्रशांत पाटील, गंगाधर पट्टणशेट्टी, मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, वीरशैव लिंगायत आर्चक, पुरोहित कमिटीचे जिल्हा अध्यक्ष पुरोहित विरुपाक्ष पुजारी ग्रामस्थ उपस्थित होते.
अंमणगी श्री मल्लिकार्जुन देवदर्शनाल अनुमती- अंमणगी श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे आर्चक पुरोहित विरुपाक्ष पुजारी म्हणाले, अंमणगी यात्रोत्सवात देवदर्शनाला अनुमती राहणार आहे. त्यामुळे भक्तगणांनी देवदर्शनाचा लाभ घ्यावयाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच यात्रा रहित केल्या जात आहेत. त्यामुळे पुरोहित, आर्चक आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून धार्मिक कार्यक्रमांत अडसर निर्माण करण्याचे कार्य थांबवायला हवे आहे. यात्रोत्सवावर अवलंबित लोकांचा विचार सरकार का करीत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अंमणगी यात्रोत्सवात भक्तगणांनी देवदर्शनाचा लाभ घेऊन पुनित होण्याचे कार्य करावे असे त्यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *