
कार्तिक दीपोत्सवानिमित्त कार्यक्रम : आयोध्यातील राम मंदिराची रांगोळी आकर्षण
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात रविवारी (ता.२६) रात्री कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त महादेव मंदिरसह सांस्कृतिक भवनात भाविकांनी ५ हजार दिवे लावले. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी आयोध्यामधील नियोजित राम मंदिराची रांगोळी दीपोत्सवाचे खास आकर्षण ठरले.
प्रारंभी महादेवाच्या पालखीची प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर आमदार शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व मान्यवरांच्या उपस्थितीत महादेवाची आरती करण्यात आली.
त्यानंतर मुरुगेंद्र स्वामी विरक्त मठातील बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या प्रमुख उपस्थितीत जोल्ले दाम्पत्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन झाले.
यावेळी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार, येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले व मान्यवरांनी दीपोत्सवामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर भाविकांनी दीप लावून दीपोत्सव साजरा केला. यंदा ५ हजार दिवे लावल्याने महादेव मंदिर परिसरात झगमगाट दिसून आला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप झाले.
यावेळी चिकोडी येथील राजू नेर्ली यांनी आकर्षक रांगोळ्या मधून आयोध्यामधील राम मंदिर, महादेवाची मूर्तीसह विविध प्रकारच्या मुर्त्या साकारल्या होत्या. या रांगोळ्या पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (ता.२७) रांगोळ्या पाहण्यासाठी खुले राहणार आहेत. या रांगोळ्या रेखाटण्यासाठी राजू नेर्ली, देवेंद्र घस्ते, राजेंद्र मधाळे, रवींद्र कोळी, संध्या तिप्पे यांना तीन दिवसाचा कालावधी लागला. नागरिकांनी या रांगोळ्या पाहून कलाकाराचे कौतुक केले.
यावेळी उद्योजक रवींद्र शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र कोठीवाले, माजी सभापती राजू गुंदेशा, संजय मोळवाडे, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र चंद्रकुडे, विजय चंद्रकुडे , माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, डॉ. महेश ऐनापुरे, शिवकांत चंद्रकुडे, आप्पासाहेब अडीपवाडे, लक्ष्मण ठगरे, ॲड. महेश दिवाण, अरुण भोसले, विजय दुमाले, बाबासाहेब चंद्रकुडे, डॉ. एस. आर. पाटील, दीपक माने, आकाश शेट्टी, रोहित पाटील, अभिजीत मुदकुडे यांच्यासह श्री गणेश मंडळ, पालखी मंडळ, एस पी ग्रुप, निलांबिका महिला बळगच्या कार्यकर्त्यासह भावीक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta