दीपोत्सवासह इतर कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील आश्रयनगरमधील कार्तिकेश्वर मंदिरात कार्तिकेश्वर स्वामी दर्शन सोहळा पार पडला. दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळी कार्तिकेश्वर मंदिरात बाबुराव महाजन महाराजांच्या उपस्थितीत राहुल भाटले, सचिन डांगरे, पिंटू पठाडे, स्वप्निल खोत, अजय आंबोले, संतोष पाटील, विश्वनाथ शेंडगे याच्या उपस्थितीत होमहवन, पूजा व अभिषेक कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता माजी नगराध्यक्ष व मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रवीण भाटले-सडोलकर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सोमवारी (ता.२७) दुपारपर्यंत भाविकांनी कार्तिकेश्वर स्वामींचे दर्शन घेतले.
निपाणी भागामध्ये केवळ आश्रयनगरात एकाच ठिकाणी कार्तिकेश्वर मंदिर असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.
स्वागत कमानीसह मंदिराची रंगरंगोटी, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळी मंदिर आवारात कार्तिक दीपोत्सव साजरा केला. यावेळी भैरु आंबोले, संजय ढेकळे, स्वप्निल खोत, सुहास कोरडे, रोहित डांगरे, विनायक पाटणकर, संजय पठाडे, सचिन डांगरे, अजित पाटील, शंकर भाटले, संजय ढेकळे, विनोद पाटणकर, विजय गोसावी, आकाश खोत यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta