
शरद पवार :उत्तम पाटील यांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : रावसाहेब यांना यापूर्वी कर्नाटक शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील हे सुद्धा सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने शासनाकडून कर्नाटक शासनाकडून त्यांनाही सहकारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
कर्नाटक सरकारकडून सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याने उत्तम पाटील यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण कार्यालयात शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्याप्रसंगी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सहकार क्षेत्र विश्वासाचा बळावर चालत आहेत. केंद्राची विविध धोरणे व अटींमुळे सहकार क्षेत्र चालवीत असताना अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटक राज्यात अरिहंत उद्योग समूहाने सहकार क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करीत सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. उत्तम पाटील यांनी सर्वांचा विश्वास संपादन करून सहकार क्षेत्राला सामाजिक जोड दिल्याने शासनाकडून त्यांचे कार्य ओळखून त्यांना पुरस्कार देऊन गौरविले असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
उत्तम पाटील यांनी निपाणी भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने शरद पवार यांचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी वर्धमान पाटील, सचिन झेले, कपिल मिरजे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta