लक्ष्मणराव चिंगळे; चिकोडीत ब्लॉक काँग्रेसची बैठक
निपाणी (वार्ता) : येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे. काँग्रेसच्या योजना यशस्वीरित्या प्रत्येक घरांपर्यंत पोहचाव्यात, याकरीता दक्षता घ्याव्यात. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे निरीक्षण करून नव मतदार नोंदणी, दुरूस्ती आणि मयत मतदारांचे नावे कमी करणे या कार्यात व्यस्त राहून काँग्रेसची ध्येय धोरणे तळागाळांपर्यंत पोहचवावीत, असे आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले.
चिकोडी जिल्हा कार्यालयात आयोजीत जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस बैठकीत ते बोलत होते.
चिंगळे म्हणाले, सर्व ब्लॉक व आघाडीच्या युनिट अध्यक्षांनी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीची तपासणी करून वगळलेली नावे बीएलओंच्या निदर्शनास आणून द्यावीत. नवीन नावे समाविष्ट करतांना सर्व आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करावी.येत्या हिवाळी अधिवेशनाची माहिती गट व जिल्हा समितीला देण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना शासनाच्या पाच हमी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्या साठी सतत व्यस्त राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाच्या निर्देशानुसार विविध आघाडी युनिट समित्यांना कामात सक्रिय सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस महावीर मोहिते, केपीसीसी सदस्य चिदानंद मुकाणी, राजू कोटगी, किसान सेलचे दस्तगीर कागवाडे, ब्लॉक अध्यक्षा विजया अकिवाटे, ओमप्रकाश पाटील, सिद्धार्थ शिंगे, शंकरगौडा पाटील, बसवराज पाटील, महांतेश मगदुम, सागर पिंगट, विजय खदी, संतोष मुडशी, प्रदीप हालगुनी, फ्रंट युनिटच्या अध्यक्षा निर्मला पाटील, डॉ. ए. एन. मगदुम, महादेव कौलापुरे, युवराज कोळी, मल्लिकार्जुन राशींगे, नामदेव कांबळे, यल्लाप्पा शिंगे, शानुल तहसीलदार, राजू वड्डर, प्रवक्ते राहुल माचकनूर यांच्यासह डीएचएससीसी पदाधिकारी उपस्थित होते. ऍड. एच. एस. नसलापूरे यांनी सूत्रसंचालन केले. महेश हट्टीहोळी यांनी आभार मानले.