Monday , December 23 2024
Breaking News

मतदारसंघात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याचा विचार व्हावा

Spread the love

 

राजेंद्र वडर ; कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी

निपाणी (वार्ता) : गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा संघर्ष झाला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना सोडून धनशक्तीच्या मागे गेले. केवळ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्तेच शिल्लक राहिले. स्वतःकडून पैसा खर्च करून काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केले. पण राज्यात काँग्रेस सत्ता आल्यावर धनशक्तीकडे गेलेले कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. पण त्यांना पक्षात घेण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील घटनांचा विचार करावा. याशिवाय निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊनच कोणाला पक्षात घ्यायचे, याचा विचार करावा, अशी मागणी भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य व बेळगांव जिल्हा वडर समाज अध्यक्ष राजेंद्र वडर- पवार यांनी केले. गळतगा (ता. निपाणी) येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
राजेंद्र वडर म्हणाले, बेळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री म्हणून सतीश जारकीहोळी तर निपाणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील,माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्याकडे पाहिले जाते. आपलेही नेतेही तेच आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढत झाली. त्यावेळी झालेल्या अटीतटी लढतीत अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये असलेले दिग्गज कार्यकर्त्यांनी पैशाकडे बघून काँग्रेस पक्ष सोडून इतरांना पाठिंबा दिला. अनेकांनी तर थेट काँग्रेस पक्षाच्या विरोधात प्रचार करून इतर उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये आतापर्यंत काँग्रेसचे पद भोगणारे कार्यकर्ते देखील होते. असे असताना गावागावात निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार काकासाहेब पाटील यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न केले. सर्वसामान्यांना रोज राबून खाणारे कार्यकर्ते देखील स्वतःकडील पैसे खर्च करून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडही उभा केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी महिला आणि तळागाळातील मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजयी झाला. असे असले तरी कर्नाटक राज्यात काँग्रेस बहुमताने निवडून आले. त्यामुळे जनशक्तीला सोडून धनशक्तीत गेलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा गोची झाली. आता तेच कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्याला काँग्रेसमध्ये घेण्यास आमचा विरोध नाही. पण आमच्या नेत्यांनी मागील विचार करूनच त्यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. बैठकीस निपाणी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————-

अन्यथा निष्ठावांतांची मने दुखावतील

अडचणीच्या वेळी मात्र काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते झटले आहेत. आता पक्षात येऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी त्यांची अस्मिता कुठे गेली होती. जर काँग्रेसमध्ये यायचेच असेल तर इतर पक्षात का गेले? असा सवाल राजेंद्र वडर यांनी केला.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी निवडणुकीपूर्वी राजकीय संन्यास घेण्याचा विचार केला होता. त्यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी काकासाहेब पाटील हेच पुन्हा एकदा काँग्रेसचे उमेदवार राहतील, असा निश्चय केला. त्यामुळे ज्या पद्धतीने बैठक घेऊन काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील निपाणी मतदारसंघातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करून काँग्रेस पक्षात येऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात घ्यावे. पण नेत्यांनी मागील परिस्थितीचा विचार करूनच पुढचा विचार करावा, अन्यथा निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मन मात्र दुखावतील याचा विचार करावा, असे मत राजेंद्र वडर यांनी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे

Spread the love  राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *