राजू पोवार : रयत संघटनेतर्फे वनाधिकार्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यापासून शेंडूर व परिसरातील डोंगरी भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडून ऊसासह इतर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय शेतकर्यांमध्ये ही या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा संघटनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. याबाबतचे निवेदन सोमवारी (ता.10) वन अधिकारी प्रभाकर गोकाक यांना देऊन ते बोलत होते.
राजू पोवार म्हणाले, शेंडूर व डोंगर कपारीच्या परिसरातील शेतांमध्ये गवे रेडे वानरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी शेतकरी भीती व्यक्त करीत आहेत. याशिवाय गावातही वानरांचा वावर सुरू असल्याने अनेक घरांचे नुकसान होत आहे. परिणामी या भागातील शेतकरी व नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. त्यामुळे वन अधिकार्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. सध्या या हंगामातील अनेक पिके काडीला आले असताना ते वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. नुकसानग्रस्त पिकांना भरपाई द्यावी.
वनाधिकारी निवेदन स्वीकारून याबाबत योग्य तो निर्णय घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली.
यावेळी निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, भगवान गायकवाड, सर्जेराव हेगडे, शेंडूर शाखेचे अध्यक्ष पांडुरंग तोडकर, उपाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, बाळासाहेब कांबळे संजय कांबळे, बबलु कांबळे, मारुती पाटील, हरिदास तोडकर, तानाजी पाटील,बाबासाहेब भोसले, धनाजी हरेर, आर. आर. पाटील, शिवाजी वाडेकर, शंकर पाटील, मारुती नाईक, जानू तोडकर, भीमराव माने, भिकाजी मोरे, ज्योती शिंदे, सचिन पाटील, दशरथ मांगले,शिवाजी भोंगाळे, आनंदा नार्वेकर, धनाजी आंबोले, मारुती तोंदले, अशोक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …