Tuesday , March 3 2026
Breaking News

’एसटी’ला आता विषाणूरोधक कोटिंग!

Spread the love

परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास
निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे तपासण्यासाठी कोटिंगनंतर पाचवेळा ठिकाणातून स्वॅब टेस्ट घेतली जाणार आहे. जर कोटिंग हे प्रभावशाली नसेल तर पुन्हा एकदा ती गाडी कोटिंगसाठी दिली जाणार आहे. या कोटिंगमुळे एसटी प्रवास आता जास्त सुरक्षित असणार आहे.
या कोटिंग प्रक्रियेला हुबळी विभागात लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक आगारानुसार संबंधित कंपनीतील कर्मचारी कोटिंगसाठी जाणार आहेत. एसटी बसमध्ये आसन, हॅन्ड रेस्ट, गाई रेल, रेलिंग, पॅसेंजर डोर आदी ठिकाणी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. एसटी बसला केलेल्या कोटिंगमुळे कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जीवाणूपासून पुरेसे आणि दीर्घकाळ संरक्षण होईल, असे जाणकारांचे मत आहे.
हुबळी विभागातील आगारातून गाड्यांची कोटिंग केली जाणार आहे. एका गाडीला वर्षातून सहा वेळा म्हणजेच महिन्यातून दोन वेळा ही कोटिंग करण्यात येणार आहे. एक गाडी कोटिंग करण्या साठी फक्त वीस मिनिटांचा कालावधी लागणार आहे. जोपर्यंत कोटिंगच्या जागांवर काही खरचटले केले जाणार नाही. तोपर्यंत ती जागा सुरक्षित असेल अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *