
गळतगा येथे पत्रकार परिषद
निपाणी (वार्ता) : देश आणि भारतीय राज्यघटना वाचवायची असेल तर केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी दीनदलित, गोरगरीब व मागासवर्गीयांनी येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून केंद्रात काँग्रेसची सत्ता आणावी,असे असे आवाहन भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर -पवार यांनी केले. गळतगा येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
वड्डर म्हणाले, मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गट आहे. यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवावी.
केंद्रातील सरकार मागासवर्गीयाना भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. युवा वर्गाची दिशाभूल करून मन परिवर्तन करून पुन्हा सत्तेवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. पण सदर सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भारतीय राज्यघटना धोक्यात येणार आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या निष्ठावंत मतदारांच्या मुळे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखत होता. पण सद्य परिस्थितीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना, निष्ठावंत मतदारांना विश्वासात न घेता आपली कार्यपद्धती अवलंबल्याने मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.त्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चिक्कोडी लोकसभेतील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढविल्यास या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नक्की विजयी होईल.
Belgaum Varta Belgaum Varta