
निपाणी (वार्ता) : काँग्रेस हा सर्व सामान्यांचा व वचनाला जागणारा पक्ष आहे.या पक्षाने दिलेली पाच योजना पूर्णपणे राबवून दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनता काँग्रेसला विसरणार नाही, असा विश्वास माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. बोरगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
वीरकुमार पाटील यांनी, गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासाऐवजी नाचक्की केली. मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करावे. कार्यकर्त्यांनी बुथ कमिटी मजबूत करून कॉग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करावे.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या पाचही हमी योजनांची पूर्तता केल्याचे सांगितले. माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, अण्णासाहेब हावले यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta