सांगलीत अरिहंत शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सहकार क्षेत्रातून सर्वसामान्यासह व्यापारी वर्गांची आर्थिक अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सहकाररत्न रावसाहेब पाटील हे गेल्या अनेक दशकापासून प्रयत्नशील आहोत. या संस्थेने कर्नाटकासह महाराष्ट्रतही शाखा सुरू केल्या आहेत. अरिहंत सारख्या सहकारी संस्थांची या ठिकाणी नितांत गरज आहे. सांगलीच्या शाखा उद्घाटनामुळे अर्थकारणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. बोरगाव येथील अरिहंत को-ऑप. क्रेडिट (मल्टीस्टेट) सोसायटीच्या सांगली शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
करण्यात आले.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी स्वागत केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील, कर्मवीर संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जी. पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, राजवीर पाटील व संजय पाटील यांच्या हस्ते फित कापून शाखेचे उद्घाटन झाले. सांगली, कुपवाड, मिरज, महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सेफ लॉकरचे उद्घाटन झाले.
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी, नव्या ठेवी व नव्या योजनेसह आपण मल्टीस्टेटच्या माध्यमातून सांगली येथे शाखा सुरू केली आहे. सहकार क्षेत्रामुळे ग्रामीण भागासह शहराच्या अर्थकारणाला चालना मिळत आहे. येथील सभासद, व्यापारी, शेतकरी, उद्योग, व्यवसाय व विविध क्षेत्रांना वेळेत पत मिळवून देऊन त्याची आर्थिक परिस्थितीत भर पडेल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री श्रीमंत पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, नरसगोंडा पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सीईओ अशोक बंकापुरे, शाखाधिकारी प्रशांत पाटील, उल्हास चिपरे, पृथ्वीराज पवार, विशाल पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, क्रीडाईचे अध्यक्ष जयराज सगरे, प्रशांत पाटील- मजलेकर, डॉ. अजित पाटील, दिग्विजय पाटील, गौतम झेले, बाहुबली पाटील, रवींद्र खिलारे, माणिक वाघमारे, शशिकांत राजोबा, राहुल खंजिरे, सीईओ अशोक बंकापुरे, शाखाधिकारी प्रशांत पाटील यांच्यासह सांगली मिरज, कुपवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी, वसगडे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील संस्थेचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.