निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समिती (ग्रामीण) निपाणी, जिल्हा बेळगाव, कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाचे कार्याध्यक्ष अजित गणू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. निपाणी मतदारसंघामध्ये अजित पाटील यांनी युवा समिती कार्याध्यक्ष पदाला न्याय देण्याचे योग्य काम केले आहे. अध्यक्षपदी बंडा तुकाराम पाटील-मतीवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे- कुर्ली, सरचिटणीस पदी सुधीर पाटील-पडलीहाळ, मीडिया प्रमुखपदी नेताजी पाटील, खजिनदारपदी सौरभ केसरकर, मतीवडे,
कार्यकारणी सदस्यपदी हिंदुराव मोरे-मतीवडे, प्रा. डॉ. भारत पाटील-निपाणी, आनंदा रणदिवे-सौंदलगा, उदय शिंदे-निपाणी, प्रमोद कदम-श्रीपेवाडी, शिवाजी पाटील- कुर्ली, के. डी. पाटील कुर्ली, मार्गदर्शक पदी भाऊसाहेब पाटील-कोगनोळी यांची निवड करण्यात आली.
समिती मीडिया प्रमुख नेताजी पाटील यांनी, निपाणी तालुक्यातील मराठी भाषिक लोकांना समितीच्या झेंड्याखाली आणण्यासाठी युवा समितीच्या माध्यमातून निपाणी विभागात मराठी शाळा टिकण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. मराठी भाषा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली सीमाभागातील मराठी सुशिक्षित युवकांचे भवितव्य चांगले व्हावे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी व सीमाप्रश्नतज्ञ समिती अध्यक्ष माननीय खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातुन महारोजगार मेळावा यशस्वी केला.
यावेळी के. डी. पाटील, संतोष निढोरे, दीपक पाटील, आनंदा रणदिवे, भाऊसाहेब पाटील, बंडा पाटील, शिवाजी पाटील, सुरेश यादव नेताजी पाटील, किरण मगदूम, सुरेश पाटील यांच्यासह विविध भागातून कार्यकर्ते हजर होते.