Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणीत मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा

Spread the love

 

रामगिरी महाराजांवर कारवाई करा; तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र मधील नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराजांनी धर्म आणि अल्लाहच्या शरियतचा प्रचारक आणि तत्वज्ञानाचा विरोधी वक्तव्य केले आहे. ईश्वरानंतर आदरणीय, मुहम्मद अल मुस्तफा अहमद अल मुजतबा यांचा अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२३) येथील मुस्लिम समाजाने मूक मोर्चा काढून महाराजांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले.
येथील तानाजी चौकात मूक मोर्चा सुरुवात केली. दलाल पेठ, कोठीवाले कॉर्नर, अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा चौक, जुना पीबी रोड, नगरपालिका कार्यालयमार्गे तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अल्ताफ कारी यांनी, रामगिरी महाराजांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांची मने दुखावली आहेत. अशा घटना टाळण्यासाठी महाराजांना शिक्षा व्हावी. कुणीही कोणत्याही धर्माला नावे ठेवू नयेत. कायदा सर्वांसाठी समान असून कारवाई होईल अशी आशा असल्याचे सांगितले.
निवेदनातील माहिती अशी, महाराजांनी केलेले वक्तव्य वाईट रीतीने सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत आहे. या अपमानाच्या प्रत्युत्तरात जगभरातील मुस्लिमांचे हृदय रक्ताळले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून देशात मुस्लिम आणि इस्लामवर अत्याचार वाढत आहेत. सरकार अल्प संख्याकांवरील अत्याचार रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी अशा घटना वारंवार घडत आहेत. त्या रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
तहसीलदारांच्या गैरहजर आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेरगुलखान पठाण, जावेद नाईक, मैनुद्दीन मुल्ला, इरफान महात, झाकीर कादरी, अल्लाबक्ष बागवान, जावेद कोल्हापूरे, बक्तीयार कोल्हापूरे, यासीन मनेर, मौलाना इलियास, अबरार पठाण, हाफीज फारुख, हाफीज खलील, बालेचंद बागवान, जरारखान पठाण, नगरसेवक सद्दाम नगरजी, शेरू बडेघर, प्रा. डॉ. एम. एम. बागवान यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *