मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन
निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारताच्या भौतिक उभारणीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य आजही अभियंते व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे मत सीपीआय बी. एस. तळवार यांनी व्यक्त केले. निपाणीत इंजिनियर अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अमित रामनकट्टी यांनी प्रास्ताविकात असोसिएशनच्या विकासाचा आढावा घेताना घर बांधणी पासून उद्योग उभारणीपर्यंत अभियंत्यांची भूमिका प्रमुख ठरत असल्याचे सांगितले. असोसिएशनचे अध्यक्ष असिफ मुल्ला यांनी असोसिएशनच्या विकासात आजवरचे पदाधिकारी व सदस्यांचे योगदान मोठे आहे. २२ वर्षांमध्ये असोसिएशनने सामाजिक विकासामध्येही मोलाची भर घातली असल्याचे सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. एम. विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.
यावेळी असोसिएशनचे ज्येष्ठ राजशेखर हिरेकोडी, सुरेश रायमाने यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भैरू चौगुले, प्रसाद चिपलकट्टी यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास सुदेश बागडी, श्रेयश मेहता, अमर चौगुले, उमेश खोत, दीपक माने, युवराज खोत, दीपक वळीवडे, सोमनाथ परमणे,प्रमोद जाधव, गजानन वशिदार सोमज भाटले, योगेश घाटगे, अनुप पाटील रजनीकांत पाटील, अभिजीत जिरगे, पी.जी.शेंदुरे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय माने यांनी केले तर आभार असोसिएशनचे सचिव धनंजय खराडे यांनी मानले.