
वाळकी येथे पाटील कुटुंबियांचे सांत्वन
निपाणी (वार्ता) : कोणतेही महत्त्वाचे काम असो, त्याबाबत माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांनी आपल्या सोबत चर्चा करूनच करत होते. वारंवारच्या भेटीमुळे त्यांच्याशी घट्ट मैत्री झाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा दुवा निखळला आहे. शिवाय भरून न निघणारी हाणी झाल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
वाळकी येथे दिवंगत आमदार काकासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काळम्मावाडी पाण्याचा करार, मतदारसंघ वाचवणे, तंबाखू पिकावरील व्हॅट कमी करणे, भाऊ ग्रामपंचायत अशी अनेक शाश्वत स्वरूपाची कामे केली आहेत.पाटील कुटुंबीयांनी खचून न जाता धिरोदत्तपणे कार्यरत रहावे. माजी आमदार काकासाहेब पाटील हे आता आपल्यात दे नसले तरी त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. काकासाहेब पाटील यांची बहीण कराड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे काकासाहेब आले असता न चुकता आपल्या घराकडे येत होते. यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील राजकारणावर सविस्तर चर्चाही होत होती. आपण कायमपणे पाटील कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, अनेक विकास कामाबरोबरच धारवाड बेळगाव निपाणी मार्गे कराड रेल्वेचे स्वप्न काकासाहेब पाटील यांनी पाहिले होते. वेळोवेळी पाठपुरावा करण्यासह तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट त्यांनी घेतली होती. पण त्यांच्या अचानक झाल्याने ते स्वप्न अजून राहिली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांना केले.
काकासाहेब पाटील यांचे चिरंजीव सुजय पाटील, स्नुषा उमा पाटील, कन्या सुप्रिया पाटील यांचे सांत्वन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, शंकर दादा पाटील, सभापती डॉ.जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, बेडकीहाळ भाग ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, नगरसेवक अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, किरण कोकरे, प्रशांत नाईक, सुनील हिरुगडे, अस्लम शिकलगार, विनोद बल्लारी, धीरज वाडकर स्वप्निल यादव, अन्वर हुक्केरी, काकासाहेब पाटील यांचे भाऊ अण्णासाहेब पाटील, दादासाहेब पाटील यांच्यासह प्रशांत हंडोरी, बाबुराव घस्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta