Monday , December 8 2025
Breaking News

सकाळी मोर्चा, दुपारी निर्णय : सुवर्णमध्य साधून समस्यावर तोडगा; गाळेधारकातून समाधान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथे नगरपालिकेतर्फे सन १९६० पासून आजपर्यंत विविध ठिकाणी ४३० गाळे बांधून व्यवसायिकांना भाडेतत्त्वावर दिले आहे. दरवेळी परवाना नूतनीकरण करून गाळे दिले. सध्या फेरलिलाव करण्यासाठी गाळे ताब्यात देण्याची नोटीस पालिकेने दिली. पूर्वीप्रमाणे नूतनीकरण देण्याच्या मागणीसाठी गाळेधारकांनी सोमवारी (ता.१५) नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले. त्यानंतर दुपारी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी गाळेधारकांची बैठक घेऊन सुवर्णमध्य साधून समस्यावर तोडगा काढला. त्यामुळे गाळेधारकातून समाधान व्यक्त झाले.
नगरपालिका हद्दीमध्ये सन १९६० ला चाटे मार्केट,१९७५ मध्ये भाजी मार्केट, १९८९ मध्ये सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुल शेजारी,२००२ चन्नम्मा सर्कल, २००५ साली लोककान्य टिळक उद्यान कॉम्प्लेक्स, जुना मोटर स्टॅन्ड, बेळगांव नाका, दत्त मंदीर, गांधी चौक अशा प्रकारे ४३० गाळे बांधून भाडे तत्वावर गाळेधारकांना दिले आहेत. या गाळ्यांना टप्या टप्याने भाडे वाढ केली. त्यानुसार भाडेही दिलेले आहे. पुर्वीप्रमाणे नुतनिकरण करावे. अन्यायकारक भाडे वाढ करू नये. गाळेधारकांना विचारात न घेता वाढ केलेले भाडे कमी करावे.
गाळ्यांची झालेली पडझड दुरुस्ती करून मिळावी. कायम स्वरूपी गाळे भाडे तत्वावर मिळावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.
बेळगाव नाक्यावरून मोर्चा काढून गाळे धारकांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ, शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब खांबे व मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
नगराध्यक्ष सोनल कोठडीया यांनी निवेदन स्वीकारून चर्चेसाठी गाळेधारकांची बैठक घेतली. नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी, कोणावरही अन्याय होणार नाही,याची दक्षता घेतली जाईल. मात्र गाळेधारकांनी थकीत भाडे व दंडाचे रक्कम भरल्यास भविष्यात पुन्हा नवीन व्यापारी गाळे निर्माण केले जातील. दिलेल्या नोटिसा मागे घेण्यात येतील. गतवर्षी गाड्यांच्या भाड्यामध्ये वाढ केली असून पुढील चार वर्षे पुन्हा वाढ होणार नाही. यापुढील काळात लाभधारकांनी कोणालाही गाळे विक्री न करण्याच्या आवाहन केले.
नगराध्यक्षा सोनल कोठडीया यांनी, जनतेसाठी आपण कार्यरत असून चर्चा करून योग्य निर्णय घेतला आहे. कायद्याच्या चौकटीत बसूवून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना गाळेधारकांनी सहकार्य केल्यास या पुढील काळात विविध ठिकाणी व्यापारी संकुल बांधून देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी नगरसेवक राजू गुंदेशा, पालिका आयुक्त गणपती पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीस उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सभापती डॉ. जसराज गिरे, माजी सभापती सुनील पाटील, माजी नगरसेवक विजय टवळे, बाबासाहेब खांबे, गजेंद्र पोळ, अशोक लाखे यांच्यासह नगरसेवक व गाळेधारक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *