

निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.)येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजाभवानी अंबाबाई मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी लावलेल्या दिव्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता.
श्रीकांत पुजारी व प्रमोद पुजारी यांनी स्वागत केले. त्यानंतर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणकर यांच्या हस्ते दीपस्तंभाची विधीपूर्वक पूजा करून समई प्रज्वलित करण्यात आली. भाविकांनी मंदिर परिसरात दिवे लावल्याने मंदिर उजळून निघाले होते. श्रीमंत निपाणकर-सरकार यांच्या हस्ते अंबाबाईची महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास श्रीमंत धनदीपराजे निपाणकर, युवराज सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर, श्रीमंत सुकीर्तीराजे निपाणकर, श्रीमंत गायत्रीराजे, श्रीमंत राजकुमारी ऋतंबराराजे निपाणकर, अमर कदम, सौरभ चावरे, आदिती तराळ, रवींद्र कदम, प्रतीक मगदूम, शहाजी कदम, गुंडुराव नाईक, युवराज बामणे, दुर्गेश पुजारी, हर्षद पुजारी, आप्पासाहेब पुजारी, सुरेश पुजारी, राजू पुजारी, भरत पुजारी, ईश्वरी पुजारी, दुर्वा पुजारी, वर्षा पुजारी यांच्यासह परिसरातील भावी उपस्थित होते. ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रसाद पुजारी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta