

दिवाळीनिमित्त वाटले २० किलो लाडू
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दर कमी करणे अथवा मोफत साहित्य वाटणे अशक्य आहे. पण याला बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप कल्लाप्पा तावदारे यांनी दिवाळी सणात झेंडूचे दर कमी झाल्याने चार एकरातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीची फुले बेनाडीसह परिसरातील नागरिकांना मोफत वाटली. शिवाय फुले आणण्यासाठी आलेल्या नागरिकांना २० किलो लाडूचे वाटप केले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप तावदारे हे गेल्या दहा वर्षापासून शेती व्यवसाय करतात. पारंपरिक शेतीला फाटा देऊन भाजीपाला, फुले, ऊस अशी पिके घेत आहेत. यावर्षी त्यांनी ४ एकर क्षेत्रात ४ लाख रुपये खर्च करून झेंडूची पिवळी फुले घेतली होती. सुरुवातीच्या काळात चांगला दरही मिळाला. पण ऐन दिवाळीत झेंडूचे दर गडगडल्याने तोडणी खर्चही अभिनय कठीण होणार असल्याचे दिसून आले.
दिवाळी सण सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या मोबाईल वरून अनेक ग्रुप वर मोफत फुले घेऊन जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार परिसरातील नागरिकांनी मोफत फुलासह पूजेसाठी झाडेही घेऊन गेली. यावेळी आलेल्या नागरिकांना त्यांनी लाडूचे वाटपही केले.
——————————————————————–

देवावरील भक्तीपोटी मदत
आप्पाचीवाडी आणि कुरली येथे हासिद्धनाथ यात्रेच्या वेळी सर्वात मोठा झेंडूचा हार ते प्रत्येक वर्षी मोफत देत आहेत. त्यातील पिवळ्या रंगाची फुले तावदारे यांच्या शेतातीलच असतात. या हाराची किंमत २५ हजार रुपयांच्या पुढे आहे. याशिवाय आदमापूर येथील बाळूमामा यात्रेवेळी तावदारे कुटुंबीयांनी कुटुंबीयांनी खिरीसाठी तब्बल साडेतीन टन गहू पाठवले होते.
——————————————————————-
‘वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून आधुनिक शेती करत आहे. भाजीपाला फुले अशी पिके घेतली आहेत. पोलीस शेतीसाठी दररोज २० मजूर कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारे औषध फवारणी, फुल तोडणी व इतर कामे करून घेतली जात आहेत. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती केल्यास निश्चितच फायदा होतो.’
– संदीप तावदारे, युवा शेतकरी, बेनाडी
Belgaum Varta Belgaum Varta