
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या संचालक मंडळातर्फे युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांचा पाटील यांचा ५० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता.१४) अरिहंत मल्टीस्टेट संस्थेच्या सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. अशोक माळी यांनी युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संघाच्या प्रगतीसाठी या पुढील काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याशिवाय सामाजिक क्षेत्रातही निरंतरपणे कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र ऐदमाळे, प्रदीप माळी, सुमित रोड्ड, आण्णासाहेब बंकापूरे, राजू गजरे, प्रवीण पाटील, संस्थेचे सी.ई.ओ. रावसाहेब चौगुले, अरिहंत बँकेचे सी.ई.ओ. अशोक बंकापूरे, यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, संचालक बोरगाव पट्टणपंचायतचे सदस्य, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta