

रमेश जाधव यांचे आवाहन ; तालुका अनुष्ठान योजना समितीची बैठक
निपाणी (वार्ता) : राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षापासून राज्यातील नागरिकांना पाच गॅरंटी योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही. पण गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक असून ईकेवायसी न केल्यास गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळणार नसल्याची अफवा पसरली जात आहे. तर नोंदणीसाठी रखक्कमेची मागणी होत आहे. अशा अफवानवर विश्वास न ठेवता बँकेत शहानिशा करावी, असे आवाहन निपाणी तालुका गॅरंटी अनुदान समितीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी केले.
तालुका अनुष्ठान कमिटीची मासिक बैठक येथील शासकीय विश्रामगृहत मंगळवारी (ता.२५) सरकारी विश्रामधामात झाली. त्यावेळी जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका पंचायतीचे कार्यनिर्वाहक प्रवीण कट्टी होते.
अनुष्ठान कमिटीचे अधीक्षक चेतन करेप्पगोळ यांनी स्वागत केले. जाधव म्हणाले, उर्वरित चार महिन्याची रक्कमही लवकरच खात्यावर जमा होणार आहे. याशिवाय या पुढील काळातही गॅरंटी योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहेत. निपाणी तालुक्यात ६६ हजार ३२२ रेशन कार्डधारक असून यामधील अन्नभाग्य योजनेचा २ लाख २४ हजार २२१ जणांनी तर युवा निधी योजनेअंतर्गत ९८४ जणांनी नोंदणी केली असून यामध्ये १०३ डिप्लोमाधारक आहेत. या सर्वांनी १ कोटी ८१ लाख ४७ हजार ५०० रुपया चा तर गृहलक्ष्मी योजनेसाठी ६९,५०० जणांनी नोंदणी केली असून यामधील ५८ हजार ३२ जणांनी तर तर गुहज्योती योजनेचा ५३ हजार ४६२ जणांनी लाभ घेतला असून शक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ९५ लाख १८९१ जणांना लाभ घेता असून दररोज ३३ हजार महिला या योजनेअंतर्गत बसमधून प्रवास करीत आहेत. राज्यात गॅरंटी योजना सुरू होऊन अडीच वर्ष पूर्ण झाल्याने रविवारी (ता.३०) बेळगाव येथे ‘गॅरंटी उत्सव’ कार्यक्रम होणार आहे. यावेळी लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी हेस्कॉम विभागाचे अभियंता सुरेश तहसीलदार,भोज विभागाचे एच. डी. माने, तालुका आहार विभागाचे आकाश घुगरे, महिला व बालकल्याण खात्याच्या निर्मला कुरबेट्टी, निपाणी आगार सहाय्यक रवीशास्त्री, युवा निधीचे एल.एस. कोरसन्नावर, तात्यासाहेब कागले, यासीन मणेर, प्रतीक शहा, धीरज वाडकर, रमेश हराळे, जीवन थोरबोले, वैशाली खोत, अमिन बुदिहाळे, जीवन थोरबोले, गुंडू नाईक यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta