
फ्रेंड्स ग्रुपतर्फे आयोजन ; रायबागचा संघ उपविजेता
निपाणी (वार्ता) : दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील आणि हिमांशू पाटील यांच्या यांच्या यांच्या स्मरणार्थ फ्रेंड्स क्लब आयोजित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बोरगाव क्रिकेट क्लब “अध्यक्ष चषका”चा मानकरी ठरला. या संघाला रोख ५० हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले. रायबाग तालुक्यातील मोरब येथील एस. के. स्पोर्ट्स संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या संघाला रोख ३० हजार रुपये आणि चषक देण्यात आले. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे बक्षीस व चषक कडोली (बेळगाव) संघाने तर चतुर्थ क्रमांकाचे दहा हजार रुपये बक्षीस बेळगाव संघाने पटकावून यश संपादन केले.
पाच दिवसापासून या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील ४० संघांनी सहभाग घेतला. रविवारी (ता.३०) रात्री झालेल्या अखेर चार संघात उपांत्य सामने झाले. यामध्ये पहिल्या पहिल्या सामन्यात मोरब येथील एस. के. स्पोर्ट्स विरुद्ध हिंडलगा मधील निल स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला. त्यामध्ये यामध्ये मोरब संघाने हिंडलगा संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसरा उपांत्य सामना कडोली (बेळगाव) येथील मराठा स्पोर्ट्स विरुद्ध बोरगाव स्पोर्ट्स यांच्यात झाला. हा सामना बोरगाव संघाने जिंकून अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम सामन्यात दोन्ही संघात १० षटकांचा सामना झाला. त्यामध्ये बोरगाव संघाने पहिल्या व दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे ७५ आणि ४० धावा जमविल्या. प्रत्युत्तर दाखल खेळताना मोरब संघाने ६१ व २१ धावा केल्या त्यामुळे हा सामना बोरगाव संघाने ३२ धावांनी जिंकून अध्यक्ष चषकावर नाव कोरले.
बोरगाव संघाच्या राहुल कुडचे याने ४९ धावा व तीन बळी घेतले. सामनावीर म्हणून बोरगाव संघाच्या अमोल निलगुंडे तर मालिकावीर म्हणून राहुल कुडचे याला सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोरब संघाचा खेळाडू गणराज तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून याच संघाचा अमित याला रोख बक्षीस देण्यात आले.समर्थ व्यायाम शाळेचे अध्यक्ष सहकाररत्न डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, सुधाकर सोनकर यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोगित उर्फ निकु पाटील, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सुजय पाटील, उत्कर्ष पाटील, इंद्रजीत पाटील, उत्कर्ष पाटील, शंतनू मानवी, विनोद बल्लारी, दिलीप पठाडे, रमेश भोईटे, अस्लम शिकलगार, सागर पाटील, छोटू पावले, कृष्णात कुंभार, गजानन चव्हाण यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. दादासाहेब हळवणकर आणि हर्षल गावडे यांनी स्पर्धेचे समालोचन केले.
—
Belgaum Varta Belgaum Varta