Monday , September 21 2026
Breaking News

पीएचडी पदवी न मिळाल्याने विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

 

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एचडी पदवी प्रदान न केल्याने एका विद्यार्थिनीने अस्वस्थ मनस्थितीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुजाता बेंडी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून सदर विद्यार्थिनीने 19 गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सुजाता हिने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजताच तिला बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.

सदर विद्यार्थ्यांनीने सहा महिन्यांपूर्वी रायबाग प्रदेशाच्या ऐतिहासिक विषयावर व्यापक संशोधन करून प्रबंध सादर केला होता यावेळी तिला विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पीएचडी पदरी मिळण्याची अपेक्षा होती, परंतु विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तिला पदवी प्रदान करण्यात आली नाही. विद्यापीठात जाणून बुजून तिला लक्ष्य केले जात आहे त्यामुळे तिला पदवी प्रदान करण्यास नकार देण्यात आला आहे. यापूर्वी देखील सदर विद्यार्थिनीने मूर्ती यांच्या वर्तवणुकीबद्दल कुलगुरू आणि पुढे सचिवांकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर सदर प्रकरण चर्चेअंती मिटवण्यात आले होते. परंतु विद्यापीठाचे कुलगुरू सी. एम. त्यागराज यांनी सुजाता हिला पीएचडी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सुजाता यांनी गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *