एकापेक्षा एक अशा कुस्त्यांनी मैदान रंगले : कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील ग्रामदैवत श्री मलकारसिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात एकापेक्षा एक अशा कुस्त्या झाल्याने या कुस्ती मैदानाला कुस्ती प्रेमींच्याकडून प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांकाची कुस्ती तुषार जगताप- अहमदनगर व हरीश देहल्ली-उत्तराखंड यांच्यात तर दुसर्या क्रमांकाची कुस्ती रामकृष्ण बेरे व अजिंक्य गायकवाड यांच्यात अटीतटीच्या झाल्या. मात्र या दोन्हीही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.
कुस्ती मैदानाचे उदघाटन ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील म्हाकाळे, सुरेंद्र पाटील, मारुती बन्ने, अरिहंत तेरदाळे, शशिकांत चौगुले, प्रेमनाथ कुंभार, अमोल करवते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले.
कुस्ती मैदानास बसवज्योती युथ फौंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, सिद्धार्थ हवले व मान्यवरांनी भेट देऊन कुस्ती मैदानाला शुभेच्छा दिल्या. कुस्ती मैदानात पंच म्हणून मलकारी पुजारी, सुनील लोंढे, मारुती कुंभार, मारुती बत्ते, सचिन सासणे, बाबासो निंगनुरे, बबन बत्ते, महावीर करवते, शामराव मोरे, प्रमोद निंगनुरे, सुनील पुजारी, उत्तम बन्ने यांनी काम पाहिले. कुस्ती मैदानाचे निवेदन सुकुमार माळी व सर्जेराव कुंभार यांनी उत्कृष्ठ प्रकारे करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल म्हाकाळे, उपाध्यक्ष जयपाल चौगुले, अमोल करवते, मारुती बन्ने, बाबू कुंभार, प्रवीण गायकवाड, सागर चौगुले, मुकुंद कुलकर्णी, शशीकांत चौगुले, सदाशिव गुरव, ग्राम पंचायत अध्यक्षा वैशाली कुंभार, उपाध्यक्ष सुनील म्हाकाळे यांच्यासह सदस्यानी परिश्रम घेतले.
मुलींच्या कुस्त्यांना प्रतिसाद
यावेळी स्नेहल पुजारी-चंदूर, सोनल खोत- कबनुर, पूजा सासणे- माणकापूर, ऋतुजा पुजारी-इचलकरंजी, श्रावणी सांगावे-इचलकरंजी, प्रीती शेंडे-रांगोळी या मुलींच्या कुस्त्या प्रेक्षणीय अशा झाल्या.