Wednesday , March 11 2026
Breaking News

मत्तीवडे येथे घराला आग लागून; रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना मत्तीवडे (ता. निपाणी) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जागृततेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रामचंद्र कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे घरातील कुटुंबीय घराबाहेर पडले. या आगीमध्ये रोख रक्कम व प्रापंचिक साहित्य आगीत भस्मसात झाले. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी सकाळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी कांबळे कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला व रोख पाच हजार रुपयांची मदत केली.
घटनास्थळी निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनी भेट देऊन पाहणी केली. सर्कल व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेचा पंचनामा करण्याची सूचना केली.
या घटनेमुळे कांबळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पुनर्जीवनासाठी शासनाने तातडीने मदत करावी. तसेच मत्तीवडे परिसरातील नागरिकांनीही या कुटुंबाला आर्थिक मदत करुन दिलासा द्यावा असे आवाहनही राजू पोवार यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे, चिकोडी तालुका मार्केटिंग कमिटीचे उपाध्यक्ष बाबुराव खोत, आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष विश्वास आबणे, धनाजी पोटले, परशुराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *