Monday , June 22 2026
Breaking News

“जय, जय महाराष्ट्र” गीत म्हणणाऱ्या तिघांवर खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा

Spread the love

 

बेळगाव : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवताच राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे आनंदोत्सव साजरा करताना “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत म्हणून आनंद साजरा करण्यात आला, याचे पोटशूळ उठलेल्या काही कन्नडधार्जिण्यानी खडेबाजार पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विनायक उर्फ गणपत जयसिंग राजपूत, (रा. बापट गल्ली), सुनील संभाजी पाटील (रा. कंग्राळ गल्ली), शुभम चंदन ठाकूर (रा. गणाचारी गल्ली) आणि इतर दोन ते तीनजणांनी चन्नम्मा सर्कलमध्ये सार्वजनिक अशांतता निर्माण होईल असे कृत्य केले असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध खडेबाजार पोलीस स्थानकात कलम १९२ बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मराठी तरुणांना अटक करण्यात आली असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

एक्सलंट योगा क्लासेसतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love  बेळगाव : “योग महर्षी पतंजली यांनी सुरू केलेल्या आणि रामदेव बाबा व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *