Saturday , March 14 2026
Breaking News

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हाकवे येथील दुचाकीस्वार ठार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ साताप्पा चौगुले (वय २५ रा. महाकवे ता.कागल) असे मृत युवकाचे नाव आहे
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून सौरभ चौगुले हा आपल्या दुचाकीवरून येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कृषी मेळावा पाहण्यासाठी गेला होता. तेथील पाहणी झाल्यानंतर तो दुचाकीवरून आपल्या मूळ गावी रात्री साडेअकरा वाजता सुमारास म्हाकवे येथे जात होता. त्यावेळी यमगर्णी जवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.या अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी, सौरभ हा आपल्या दुचाकी वरून निपाणी येथील हालसिद्धनाथ साखर कारखान्यावर आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेला होता. तेथून रात्री साडेअकरा वाजता तो म्हाकवेकडे निघाला होता. त्यावेळी पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आपला झाला. त्यामध्ये त्याच्या डोक्यासह इतर ठिकाणी मोठी दुखापत झाली. अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. कोल्हापूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व सहकार्य भेट देऊन पंचनामा केला आहे. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
चौगुले कुटुंबामध्ये सौरभ हा एकुलता एक मुलगा होता. सौरभ हा सौंदलगा आणि कुर्ली फाटावरील एका कापड दुकानात काम करत होता.त्याच्या दुर्देवी निधनाने म्हाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी (ता.१३) सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले
त्याच्या मागे आई-वडील, पत्नी आजी मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.१५) सकाळी नऊ वाजता आहे.

About Belgaum Varta

Check Also

काम चालू, रस्ता बंद असल्याने मांगुर फाटा, मुरगुड रोडवर वाहतुकीची कोंडी

Spread the love  राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा परिणाम; नागरिकासह वाहनधारकांचा फेऱ्याने प्रवास निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *