Tuesday , March 3 2026
Breaking News

दुचाकी अपघातात युवक ठार

Spread the love

ममदापूर येथील घटना; दोघेजण गंभीर
निपाणी : निपाणी इचलकंजी मार्गावर ममदापूर (केएल) येथील अंबिका देवालयाजवळ दुचाकीला अपघात होऊन युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. अनिकेत सुरेश यादव (रा. ममदापूर, वय 20) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत.
अनिकेत यादव हा संकेत संतोष कदम (वय 22) व लखन बिराप्पा चिंगळे (23) यांच्यासह दुचाकीवरून (केए 23-7179) गणेश विसर्जनासाठी लागणारे साऊंड सिस्टिम आणण्यासाठी गळतगा येथे जात होता. ममदापूर येथील अंबिका देवालयाजवळ आल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात घडला.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या अनिकेत यादव याला कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. लखन चिंगळे याला अधिक दुखापत झाल्याने निपाणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र आजन्नावर व सहकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. मयत अनिकेत यादव याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. दुचाकी अपघातात अनिकेत यादव यांचे निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *