निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये सौंदत्ती येथे रेणुका देवीचा जग, महादेवाची कावड श्रीशैल आंध्र प्रदेश इथून व श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे निपाणकर यांच्या मानाची काठी व पालखी, जोतिबाची मानाची काठी जाऊन आल्यावर सर्व देव-देवतांना एकत्र बोलवायचा कार्यक्रम राजवाडामध्ये झाला. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला सर्व मानकरी निपाणी राजवाड्यातून वाजत गाजत हरिजनवाड्यातील रेणुका देवीचा जग आणण्यासाठी व ज्योतिबाची सासनकाठीचा वसेदार घराण्याचा मान आहे. सासने गल्ली येथील विजय सासणे यांच्याकडे सासन काठी, महादेवाची पालखी व कावड यांच्याकडे मान आहे. देवी-देवता लवाजम्यासह निपाणकर राजवाड्यामध्ये आल्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन निपाणकर राजवाड्यामध्ये केले. यावेळी पंचक्रोशीतील सर्व मंदिरातील पुजारी यांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी ज्योतिबाचा जागर झाला.
यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर, युवराज सिध्दोजीराजे निपाणकर, श्रीमंत शरदराजे निपाणकर, प्रकाश मोहिते, सुजितसिंह गायकवाड, संदीप पाटील, गजानन वसेदार, बाळासाहेब वसेदार, विजय सासणे, जयवंत सासणे, हेमंत सासणे, गजेंद्र सासणे, हेमंत सासणे, रवी कोठुवाले, राजशेखर कोठीवाले, शिरीष कमते, बाळासाहेब कळसकर, मोहन कमते, युवराज पाटील, संजय कांबळे, महादेव माने, किरण माने, विलास मोरे, आनंद पाटील, अमोल केसरकर, संतोष चव्हाण, सुरेश तेरदाळे, प्रमोद पुजारी, जयवंत पाटील, शिवाजी माने, संदीप पडवळे, कुणाल वसेदार, रेणुका हेगडे, शोभा हेगडे, सारिका हेगडे, आरती हेगडे, वैशाली हेगडे व मानकरी उपस्थित होते.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …