Tuesday , September 17 2024
Breaking News

विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे बुट, साॅक्स द्या

Spread the love
राजेंद्र वड्डर : अन्यथा आंदोलन
निपाणी (वार्ता) : दोन वर्ष्याचा प्रदीर्घ कोरोना महामारीच्या अडथळ्या नंतर या वर्षी कर्नाटक सरकारकडून पुन्हा लवकरच विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय सदर सर्व जबाबदारी एसडीएमसी सदस्यांना देण्यात आल्याने गळतगा येथील विद्यार्थ्यांना एसडीएमसी सदस्यांनी चांगले आणि दर्जेदार बूट आणि पायमोजे वितरण करावे, अन्यथा आंदोलनांला सामोरे जावे लागेल, असा इशारा भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य आणि आरोग्य, शिक्षण स्थायी समितीचे माजी सदस्य राजेंद्र वड्डर पवार यांनी दिला. ते गळतगा येथे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेंद्र वड्डर पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचे शाळेकडे पूर्णतः पाठ फिरविले होते. त्यादृष्टीने सरकारही शाळा आणि शाळेच्या इमारतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. शिवाय विद्यार्थ्यांना आणि शाळेसाठी असलेल्या योजना आणि निधीही सरकार कडून बंद करण्यात आले होते. पण यावर्षी सन २०२२ – २३ या सालातील शैक्षणिक सालाला १६ मे पासून सुरू झाले आहे. पण अद्याप बूट आणि पायमोजे वितरण केले नाही. कर्नाटक सरकारकडून विद्यार्थ्यांच्यासाठी शु भाग्य योजना जाहीर केले आहेत. त्यासाठी १३२ कोटी रुपये वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी ४३ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे पहिलीपासून दहावीपर्यंत विध्यार्थी आहेत. या सर्वांच्यासाठी बूट आणि पायमोजे वितरण करण्यात येणार आहे. पण सदर विध्यार्थाना सरळ बूट आणि पायमोजे वितरण न करता त्याची संपूर्ण जबाबदारी त्या त्या शाळेच्या एसडीएमसी सदस्यांना देण्यात आली आहे.
एक जोड काळे बूट आणि दोन जोड पांढरे पायमोजे देण्यात येणार आहे. एसडीएमसीला सदर अधिकार देण्यात आला असले तरी यामुळे बूट आणि पायमोजे यांच्या गुणवत्तेचे प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे. त्यासाठी एसडीएमसी सदस्यांनी सदर बूट आणि पायमोजे हे दर्जेदार असणारे वितरण करावे असे सूचना केली. एकूण ४६.३७ लाख विद्यार्थी दाखलाती म्हणून नोंद आहेत. सरकारकडून पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना २६५ रुपये तर ६ ते ८ वी पर्यंत विद्यार्थ्यांना २९५ रुपये आणि ९ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३२५ रुपये प्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे. बूट हे ०.८ एमएमच्या जाडीची असावे असे नियम करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या विकासासाठी पालक आणि शिक्षणप्रेमी कडून देणगी मिळाल्यास बुटाचा दर्जा आणखीन चांगले असणे गरजेचे असल्याची माहिती देऊन गळतगा आणि परिसरातील शाळांच्या मध्ये विध्यार्थ्यांना दर्जेदार पध्दतीने आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियमानुसार वितरण करावे अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असे राजेंद्र वड्डर पवार यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार

Spread the love  बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *