Thursday , March 5 2026
Breaking News

निपाणीत रेशनचा 600 किलो तांदूळ जप्त; आहार विभागाची कारवाई

Spread the love

 

निपाणी : रेशनवर विकल्या जाणार्‍या तांदळाची भरदिवसा रिक्षातून तस्करी करणार्‍या एकावर तालुका अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी कारवाई केली. अझरुद्दीन अकबर मुजावर (वय 29, रा. हिदायतनगर, निपाणी) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे.

हरीनगर येथून संशयित अझरुद्दीन हा आपल्या तीन चाकी रिक्षातून रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती आहार निरीक्षक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार गायकवाड यांनी छापा घालून ही कारवाई केली.

अझरुद्दीनकडून 600 किलो तांदूळ जप्‍त करण्यात आला असून याची किंमत 13 हजार रुपये होते. गायकवाड यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *