

४ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग: घोषणांनी दुमदुमला परिसर
निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाच्या सहकार्याने शनिवारी (ता. १३) येथील हे असं शिक्षण संस्थेतर्फे शहरातून शालेय विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यामध्ये जवळपास पाच हजार विद्याथ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारत माता की जय’, ‘बंदे मातरम’च्या घोषणांनी निपाणीपरिसर दुमदुमला होता. शहरातील विविध मार्गावरून फेरी काढल्यानंतर पुन्हा व्ही. एस. एम. शिक्षण संस्थेच्या मैदानावर फेरीचा समारोप झाला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत तहसील आणि नगरपालिकेतर्फे १ ऑगस्टपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता.१३) सकाळी शहरातून हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रभात फेरी काढली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, तहसीलदार प्रवीण कारंडे, यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ झाला. यावेळी संचालक संजय मोळवाडे, पप्पू पाटील, एस.जी.कल्याणशेट्टी, समीर बागेवाडी, प्रवीण पाटील, विनायक ढोले, गणेश खडेल, हरिश्चंद्र शांडगे, प्राचार्य एन.एस. मादन्नावर सिद्धगोंडा पाटील, जी एम कमते, बीके नाईक, वाय. बी. हंडी, आर. एम. मलकापूरे, मनीषा महाजन यांच्यासह संचालक व सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सीआरसी आणि बीआरसीप्रमुख उपस्थित होते. या फेरीमुळेसंपूर्ण शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले.
——————————–
‘आझादी का अमृत महोत्सवमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे’
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले. येणाऱ्या वर्षांत देशाला बलशाली बनविण्यासाठी तयार केलेल्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांत कोठीवाले यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta