Monday , September 21 2026
Breaking News

सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक; एकाचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात पेट्रोलच्या टँकरला कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हुबळी येथील शांतीनगर येथील रहिवासी 34 वर्षीय सागर केशन्नावर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी ते कारमधून आले होते. सौंदत्तीजवळ पेट्रोल टँकरची कारला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.
या घटनेत तीन जण जखमी झाले असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी टँकरमधील
पडलेला पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *