
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील, हणबरवाडी, दत्तवाडी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
चालू वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव असल्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावला होता. दोन-तीन दिवसांमध्ये तिरंगा रॅली, जनजागृती आदीसह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कोगनोळी हायस्कूल, श्री अंबिका आदर्श विद्यालय, महिला बचत गट, अंगणवाडी शिक्षिका, अशा कार्यकर्त्या, महिला यांच्यावतीने तिरंगा रॅली काढली होती.
येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. कोगनोळी दत्तगुरु संस्थेत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रतिमा पूजन सी. वाय. पाटील यांच्या हस्ते केले. आझाद तरुण मंडळ येथे धोंडीराम पाटील गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
अंबिका पतसंस्था येथे व्हाईस चेअरमन शिवाजी खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. कोगनोळी हायस्कूल येथे पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. हलसिद्धनाथ उद्योग समूह येथे चेअरमन देऊ कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. जनता पतसंस्था येथे पद्मराज माणगावे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. पशुवैद्यकीय दवाखाना येथे बाळासाहेब कागले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. तलाठी कार्यालय येथे तलाठी के. एल. पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ येथे संस्थेचे चेअरमन अनिल चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. कोगनोळी पोलीस स्टेशन येथे एएसआय एस. ए. कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. अरिहंत को. ऑप. क्रेडिट सौहार्दमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगवले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. बिरेश्वर संस्थेत संस्थेचे चेअरमन कुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. महिला प्रियदर्शनी बँकेत अध्यक्षा आशाराणी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमा पूजन उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्या हस्ते तर ध्वजारोहण अध्यक्षा छाया पाटील यांच्या हस्ते झाले.
ध्वजारोहण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
हणबरवाडी येथील प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जय हनुमान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ येथे बापूसाहेब पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. हनुमान मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे उत्तम भीमराव खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महालक्ष्मी प्राथमिक कृषी पत्तिन सहकारी संघ बाळासाहेब हादीकर, दत्तवाडी प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत बाळासाहेब बिद्रोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रतिमापूजन संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. हालसिध्दनाथ नगर येथील प्राथमिक मराठी मुलांमुलींच्या शाळेत शाळा सुधारणा समिती अध्यक्ष नवलाप्पा गोरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, वंदना चौगुले, सुनील कागले यांच्या हस्ते झाले.
Belgaum Varta Belgaum Varta