सौंदलगा : सौंदलगा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्रा. पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर ग्रामपंचायत उपाध्यक्षा सुजाता चौगुले यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. श्री महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये चेअरमन तानाजी वाक्रुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वज पूजन रमेश रेवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक कृषी पत्तीन संघामध्ये ध्वजारोहण चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीरेणुका मल्टीपर्पज सोसायटीमध्ये ध्वजारोहण पांडुरंग सदाशिव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीनरसिंह पी.के.पी.एस. व अरिहंत बँकेमध्ये माजी सैनिक नामदेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर माजी सैनिक सज्जन पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. शेतकरी दूध उत्पादक सोसायटीमध्ये माजी सैनिक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन रघुनाथ चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निपाणी हॉर्टिकल्चरमध्ये संचालक आय. जी. मुल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण तर ध्वजपूजन संचालक आप्पासो कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राम चावडीमध्ये तलाठी एस. एम. पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठी मुलांच्या शाळेमध्ये एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बिरेश्वर को-ऑप. सौहार्दमध्ये चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बोरगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ध्वजपूजन संचालक व भालचंद्र जोशी तर ध्वजारोहण सिद्धगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यासह विविध ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta