युवा नेते उत्तम पाटील: ’अरिहंत’ शाळेत शुद्ध पेय घटकाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : शाळेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी सदृढ व निरोगी झाला पाहिजे, यासाठी त्याला सर्वच घटकांची आवश्यकता असते. त्यात प्रामुख्याने शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना शाळेतच शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शाळेचे संस्थापक रावसाहेब पाटील यांनी, आपल्या शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत शुद्ध पेय जल घटक उभारल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड, मराठी व इंग्रजी या शाळेमध्ये संस्थेच्या वतीने शुद्ध पेय जल घटक बसविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करून उत्तम पाटील बोलत होते.
या घटकामुळे यापुढे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळणार असून त्यांचा आरोग्य निरोगी होण्यासाठी मदत होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
युवानेते उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक प्रदीप माळी यांच्या हस्ते शुद्ध पेय जल घटकाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमास लेफ्टनंट अक्षय गुरव, विनयश्री पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदुम, दिगंबर कांबळे, अनिल गुरव, सुभाष शेट्टी, अभयकुमार करोले, अशोक बंकापुरे, अण्णासाहेब भोजकर, सुमित रोड्ड, रमेश माळी, दर्शन पाटील, अजित सावळवाडे, हिराचंद चव्हाण, प्रविण पाटील, तैमुर मुजावर, अनिल ढोंगे, महादेव उल्पे, सुजित उळागड्डे, शमिका शहा, दयानंद सदलगे, अजित कांबळे, यांच्यासह शाळा पदाधिकारी व पालक उपस्थित होते. रावसाहेब सावंत यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta