सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून मयत सभासदांच्या वारसांना सहाय्यधन व अंत्यविधी निधीचे संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी संघाच्या सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्याबरोबरच जे संघाचे सभासद मृत्यू झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी म्हणून संघाकडून त्यांच्या वारसांना दोन हजार निधी दिला जातो. ही योजना गेल्या तीन वर्षापासून चालू आहे. तसेच कर्जदार सभासद मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दहा हजाराचा निधी दिला जातो ही योजना संघाकडून दोन वर्षे झाली चालू केली आहे. आतापर्यंत दहा कर्जदार सभासद व पंचवीस सभासदांना याचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी सभासद मयत झाल्यानंतर संघाकडे संपर्क साधावयाचा असून आज आम्ही मयत कर्जदार सभासद तुळजाराम देवबा शेवाळे यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती तानाबाई तुळजाराम शेवाळे यांना सहाय्यधन दहा हजार व अंत्यविधी निधी दोन हजार देत आहोत. त्याचप्रमाणे कर्जदार मयत सभासद लहू जानू पाटील यांचे वारस युवराज लहू पाटील यांनाही सहाय्यधन दहा हजार व अंत्यविधी निधी दोन हजार देत आहोत. इथून पुढेही सभासदांसाठी संघाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले.
यावेळी चिकोडी जिल्हा वक्फ बोर्डाचे सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आरीफ मुल्ला यांचा संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. संजय अडसूळ, सदस्य आप्पासाहेब ढवणे, डॉ. तानाजी पाटील, संभाजी साळुंखे, सबगोडा पाटील, भारतसिंग रजपूत, राजश्री मोरे, महादेव कांबळे, विमल पाटील, बाळासाहेब चौगुले, अंजना नाईक, रघुनाथ मोरे, मारुती गुरव, बाळासाहेब काळुगडे, जयसिंग पाटील, सुनील बोरगावे यासह सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta