Monday , April 20 2026
Breaking News

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

Spread the love

नवी दिल्ली : सीबीआयने राजधानी दिल्लीमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरासहित २१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

“सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपल देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनिष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच, “सत्य लवकर समोर यावे म्हणून आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू. माझ्यावर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. या कारवाईतूनही काहीही समोर येणार नाही. चांगले शिक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नांना कोणीही रोखू शकत नाही,” असेदेखील सिसोदिया म्हणाले.

…म्हणूनच आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी : अरविंद केजरीवाल

सिसोदिया यांच्याविरोधातील या कारवाईवर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीमधील शिक्षण आणि आरोग्य सवेवर होत असलेल्या कामाची दखल जगभरात घेतली जात आहे. या कामाला यांना थांबवायचे आहे. याच कारणामुळे आरोग्य आणि शिक्षणमंत्र्यांच्या घरावर छापेमारी करण्यात येत आहे. ७५ वर्षातील सर्व चांगल्या कामांना थांबवण्याचे काम करण्यात येत आहे. याच कारणामुळे भारत पिछाडीवर आहे,” अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *