सौंदलगा : सौंदलगा येथील वार्ड नंबर दोन मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून सीसी गटार व सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संग्रामसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचाय सदस्य विक्रम पाटील म्हणाले की, आज आम्ही वार्ड नंबर दोन मधील दगडू पाटील यांच्या घरापासून पांडुरंग पाटील यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता २०० फूट, सीसी गटार २०० फूट या कामाचा शुभारंभ करीत असून हे काम चांगल्या पद्धतीने केले जाणार आहे. यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून हे काम होणार आहे. यापुढे वार्डात विविध विकासकामे राबवली जाणार आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद माने, अरुण शिंदे, सदस्या रेखा पोवार, संजय कोळी, विनोद कांबळे, रोहित शेवाळे, विष्णू मुरचिठ्ठे, वसंत पाटील, दगडू पाटील, सागर पाटील, उत्तम पाटील, उत्तम लोहार, राजू खोत, अतुल पाटील यासह महिला व वार्डातील ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी आभार अनिल पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta