कोगनोळी : येथील रहिवासी पद्माकर पाटील उर्फ संजू आक्कोळे, शशिकांत चौगुले यांचा सेवा निवृत्ती निमित्त पुण्यातील कोगनोळीकर ग्रुपतर्फे सत्कार केला.
दोघांनीही 30 वर्षापेक्षा जास्त शासकीय विभागात मोलाचे योगदान देऊन जबाबदारी पार पडली.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन समीर पाटील तर सूत्रसंचालन बबन पाटील यांनी केले. पुण्यातील हार्वेस्ट गार्डन क्लब येथे दिपक पाटील, आनंद ऐवाळे यांनी स्वागत तर अभय गळतगे, जयसिंग पाटील यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
सरकारी विभागात काम करत असताना आलेले अनुभव, कर्तव्य, निष्ठा, प्रामाणिकपणे काम त्यातून येणाऱ्या अडचणींवर मात करत कसे यश मिळवायचे मार्गदर्शन पद्माकर यांनी केले.
नोकरी करत असताना उच्च शिक्षण सुद्धा महत्वाचे आहे. आपली मुलेच आपली खरी गुंतवणूक असते असे शशिकांत चौगुले यांनी सांगितले.
यावेळी संजय पाटील यांनी कोरोना काळातील आपले अनुभव सांगताना काय काळजी घ्यावी यावर चर्चा केली.
गेली अनेक वर्षे गावातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मदत, मराठी शाळेचा विकास, गावातून पुण्यात आलेल्या मुला-मुलींची राहण्याची सोय असे विविध उपक्रम कोगनोळीकर ग्रुप तर्फे राबवाण्यात येत आहे.
यावेळी ग्रुपचे अजित मगदूम, प्रवीण पाटील, जयसिंग पाटील, प्रताप पाटील, राजू माने, राजू चौगुले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta