गणपती दाभोळे : 38 वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : येथील माजी सैनिक मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीची 38 वी वार्षिक सभा नुकतीच झाली. गणपती दाभोळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दिनकर पाटील यानी प्रास्ताविक केले.
आर्थिक वर्षामध्ये संस्थेला 3 लाख 43 हजार 196 इतका निव्वळ नफा झालेला आहे. सभासदांना 16% लाभांश जाहीर केला आहे. जयसिंग पाटील यांनी मागील सभेचे वृत्तांत वाचन केले. इरगोंडा पाटील यांनी अहवाल वाचन केले. सभेस उपाध्यक्ष दिनकर पाटील, संचालिका रूपाली तोडकर, भारती निर्मळे यांच्यासह सभासद, विलास मिरजे, भिकाजी पाटील, मारूती पाटील, प्रकाश पाटील, दिनकर पावले, वसंत पावले, संजय इंगळे सुरेश पाटील, यशवंत पाटील, ज्ञानदेव कुंभार, भिमराव पाटील, महादेव निकाडे, विठ्ठल चौगले, हिंदूराव अब्दागिरे, बाबू वडतले उपस्थित होते. संचालक मधुकर पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta