राजू पोवार :हालसिद्धनाथ साखर कारखान्याची वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याची 34 वी वार्षिक सभा शनिवारी (ता.24) झाली. कारखान्याचे सभासद म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाली यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर साखर कारखान्यानी चालू वर्षी एफ आर पी पेक्षा 500 रु दर जास्त देण्यात यावा, अशी मागणी रयत संघटनेचे राजू पोवार यांनी केली. मात्र या प्रश्नावर उत्तर न मिळाल्याने रयत संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.
वार्षिक सभा संपल्यानंतर माध्यमाशी बोलताना राजू पोवार म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प उभारणीला विरोध नाही त्यामुळे आम्ही कारखान्याच्या या सभेला कोणताही गालबोट लावलेला नाही. तशी वर्तणूक केली नाही. कारखान्याने एफ आर पी पेक्षा 500 रुपये जादा दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. त्याचबरोबर पुर्वी शेतकरी सभासदांना मिळणारी वार्षिक साखर 100 किलो वरुन 50 किलो केली आहे. ती पुर्वीप्रमाणे 100 किलो करावी.
आमचा कोणत्याही जाती, धर्म, पक्ष व नेत्याला विरोध नाही. चांगले काम करणाऱ्यांना हेतू परस्पर विरोध करणार नाही. परंतु शेतकरी सभासदांना ज्यादा दर मिळावा यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला.
याप्रसंगी संघटनेचे रमेश पाटील, उमेश भारमल, सर्जेराव हेगडे, हालप्पा ढवणे, भगवंत गायकवाड, बबन जामदार, एकनाथ सादळकर, आनंदा पाटील, बाळासाहेब हादीकर, संजय पवार, विश्वनाथ पवार, महादेव शेळके, महादेव विटे, चिनू कुळवमोडे, संजय नाईक, बाळासाहेब पाटील, सखाराम पाटील, नानासाहेब पाटील, राजाराम पाटील, सदाशिव शेटके बाबासो पाटील यांच्यासह रयत संघटनेचे शेतकरी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta