निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बापूसाहेब गोरवाडे यांचे सुपुत्र डॉ. वीरकुमार गोरवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतेच पीएचडी पदवी मिळाली. वीरकुमार यांनी ’आग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयावर विषय सादर केला होता. त्यांनी सादर केलेला या विषयावर शिवाजी विद्यापीठाचा शेती रसायन व कीट व्यवस्थापन विभागाकडून विशेष असे प्रशंसा करीत त्यांना पीएचडी पदवी देण्यात आले. यांना देवचंद कॉलेजचे डॉ. पी. डी. शिरगावे यांचे मार्गदर्शन लाभले. बोरगाव शहरातील के. एस. पाटील शाळेत माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी निपाणीच्या जीआय बागेवाडी कॉलेजमध्ये बी.एससी पदवी मिळवली.
त्यानंतर देवचंद कॉलेज येथे एम.एससी पदवी मिळवून त्या ठिकाणी पीएचडीचे अध्ययन केले त्यांनी सादर केलेल्या ऍग्रो केमिकल व वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर शिवाजी विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केले.
वीरकुमार गोरवाडे हे होतकरू व शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर नेहमीच शिक्षण घेतले. सर्वांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपण पीएचडी करण्याचे ठरविले. या अनुषंगाने त्यांनी अत्यंत कष्ट घेऊन पीएचडी पदवी मिळवले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta