निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य नोकर संघ निपाणी तालुक्याची सभा सोमवारी (ता.१०) सायंकाळी चार वाजता येथील बस स्थानकाजवळील आशीर्वाद मंगल कार्यालय मध्ये होणार आहे. यावेळी राज्याध्यक्ष व मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
राज्याध्यक्ष यांचा सत्कार होणार आहे. यावेळी सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य नोकर संघटनेतर्फे करण्यात आले आहे. यावेळी कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघाचे राज्य अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी, बी. टी. रायवगोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका राज्य सरकारी संघाचे अध्यक्ष
एम. वाय. गोकार, राज्य नोकर संघाचे गौरव अध्यक्ष जी. एल. चिटनिस, राज्य सरकारी नोकर संघाचे कोषाध्यक्ष संजीव खामकर, राज्य परिषद सदस्य नोकर सरकारी तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta